भारत देशाचा दानवीर हीरा काळाच्या पडद्याआड…

भारतातील टाटा समूहाचे सर्वेसर्वा रतन टाटा यांचे निधन

 

 

सविस्तर वृत्त : ज्येष्ठ उद्योगपती आणि भारतीय उद्योग जगताला एका नव्या सुवर्णकाळात नेणाऱ्या उद्योजक रतन टाटा यांनी वयाच्या 86 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचारांदरम्यान त्यांचं निधन झालं. टाटांच्या निधनाचं वृत्त समोर येताच संपूर्ण देशातून आणि जगभरातूनही हळहळ व्यक्त करण्यात आली. भारतीय उद्योग जगतासह विविध क्षेत्रांमध्येही आपलं अमूल्य योगदान देणाऱ्या रतन टाटा यांना सारा देश सलाम करत त्यांच्या योगदानाप्रती कृतज्ञता व्यक्त करत आहे 

टाटा उद्योग समूहाचे सर्वेसर्वा रतन टाटा यांनी बुधवार 9 ऑक्टोबर रोजी मुंबईतील ब्रीचकॅण्डी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पार्थिवावर गुरुवारी सायंकाळी 5 :30 च्या सुमारास वरळी येथील स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्यांचे जवळचे नातेवाईक मित्रपरिवार आणि सर्व क्षेत्रातील दिग्गज मंडळी उपस्थित होती. टाटा उद्योग समूहाचे सर्वेसर्वा रतन टाटा यांचे बुधवारी रात्री वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर वरळी येथील स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. रतन टाटा यांना मानवंदना देण्यासाठी आलेले VIP गेल्यावर तेथे  प्रचंड जनसमुदाय दाखल झाला. त्यामुळे स्मशानभूमीत गर्दी झाली. रतन टाटांना अखेरचा निरोप देण्याकरता टाटांचे नातलग आणि  जवळच्या  मित्र परिवारातील लोक यायला सुरुवात झाली असून कम्युनिटी हॉलमध्ये सामुहिक प्रार्थना झाल्यानंतर अंत्यविधी करण्यात आला  टाटा उद्योग समूहाचे सर्वेसर्वा रतन टाटा यांनी 9 ऑक्टोबर रोजी रात्री अखेरचा श्वास घेतला. रतन टाटा यांच्या पार्थिवावर मुंबई येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार असून त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी NCPA  येथे ठेवण्यात आलं होतं. दुपारी ४ चा सुमारास रतन टाटांच्या अंत्ययात्रेला NCPA तून सुरुवात झाली. शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले .

टाटा उद्योग समूहाचे सर्वेसर्वा रतन टाटा यांनी 9 ऑक्टोबर रोजी रात्री अखेरचा श्वास घेतला. रतन टाटा यांच्या पार्थिवावर मुंबई येथे अंत्यसंस्कार करण्यात आला  असून रतन टाटा यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी एमसीए येथे ठेवण्यात आला होता गृहमंत्री अमित शहा यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रतन टाटा यांच्या पार्थिवाचं दर्शन घेतलं.  टाटा समूहाचे सर्वेसर्वा रतन टाटा यांचं बुधवारी रात्री वृद्धापकाळाने निधन झालं. त्यांच्या निधनाचे दुःख म्हणून राज्यात एक दिवसाचा शासकीय दुखवटा जाहीर करण्यात आला. मंत्री उदय सामंत यांनी रतन टाटा यांच्या पार्थिवाचं दर्शन घेतलं यावेळी त्यांनी महाराष्ट्र उद्योग भवनाला रतन टाटा यांचं नाव देणार असल्याचा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.  मुंबई महापालिका आणि टाटा ट्रस्ट यांच्याकडून रतन टाटा यांच्या अंत्ययात्रा आणि अंत्यविधींचे नियोजन केलं गेले. माता रमाबाई आंबेडकर वरळी स्मशानभूमीत रतन टाटांवर संध्या ५ वाजता अंत्यसंस्कार केले गेले. तत्पूर्वी महापालिकेकडून अंत्यसंस्काराच्या ठिकाणी रतन टाटांना निरोप देण्यासाठी तयारी सुरु करण्यात आली होती  स्मशानभूमीतील- कम्युनिटी हॉल येथे सामुहिक प्रार्थना होईन. मुंबईत पावसाची शक्यता असल्यानं वॉटरप्रुफ मंडपही पालिकेकडून उभारला गेला. रतन टाटांना अखेरचा निरोप देण्यासाठी होणारी गर्दी आणि व्हिआयपी लक्षात पोलिसांकडूनह चोख बंदोबस्त. केला गेला आणि रतन टाटाना अखेरचा निरोप देण्यात आला भारतात अनेक उद्योजक झाले आणि आहेत सुद्धा पण रतन टाटाजी सारखा हीरा आणि दानवीर कोणी होऊ शकत नाही म्हणून आज या हिऱ्या भारत देश मुकला येवढे खर आहे .

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *