बदलापूर प्रकरण ताजे असतानाच अकोल्यात शिक्षकाकडून सहा विदयार्थिनींचा विनयभंग.

महाराष्ट्र पुन्हा हादरले, अकोल्यात विनयभंगाचा प्रयत्न ………

सविस्तर वृत्त: महाराष्ट्रात बदलापूर मधील दोन चिमुकलींच्या अत्याच्यारावरून अख्खे  बदलापूर पेटून उठले. आणि प्रशासन खडखडून जागे झाले. प्रशासनाने बदलापूर प्रकारण गांभीर्याने घेऊन पोलिसांकडून आरोपीला जेलबंद करून त्याला पोलीस कोठडी दिली आहे. आरोपीला फाशी मिळावी अशी आंदोलनकर्त्यांची मागणी ही बदलापूरकरांकडून केली जात होती . त्याच गोष्टीला लक्षात घेऊन हा खटला फास्टट्रक कोर्टात घेऊन आरोपीला कठोरात कठोर शिक्षा  मिळेल असे आश्वासन महाराष्ट्र राज्य सरकारने बदलापुरकरांना दीले आणि तसे पाऊल सुद्धा उचलले आहे.

हे प्रकरण ताजे असतनाच महाराष्ट्रात अकोला जिल्ह्यात उच्च माध्यमिक शाळेत शिकणाऱ्या आठवीतील सहा विदयार्थिनींचा एका शिक्षकाकडून विनयभंग केल्याचे वृत्त समजले. आरोपी शिक्षक हा अश्लिल विडीओ दाखवून विदयार्थिनींना नको त्या जागी हात लावायचा आणि विदयार्थिनींना दम देवून घाबरवत असे. ही घटना मंगळवारी एका विद्यार्थिनीने आपल्या घरी जाऊन पालकांना सांगितले. एक विद्यार्थिनीने चाईल्ड वेलफेअर संस्थेच्या हेल्प लाइन नंबरवर फोन करून आपल्या बरोबर झालेली घटना सांगितली, त्या नंतर केंद्राचे पदाधिकारी शाळेत पोहोचले असता त्यांनी लागलीच शिक्षकावर कार्यवाही केली. स्थानिक पोलिसांना पाचारण करून पोलिसांनी शिक्षक आरोपीला शाळेतून ताब्यात घेऊन त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल करण्यात आले. पोलिसांनी ह्या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक यांनी आरोपीला कुठल्याही प्रकारची सुट न देता त्यावर गंभीर ते गंभीर कलमे लावून त्याच्यावर कार्यवाही केली जाईल असे प्रसार माध्यमांना सांगितले.

तेथील आमदारांनी  या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष देवून पोलिसांना कार्यवाहीचे आदेश दिले आहेत . महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्था याचा धाक या अशा क्रूर व गल्लीछ कृत्य करणाऱ्या नराधमांना कायद्याचे भय राहिले आहे की, नाही असे आता महाराष्ट्रातील जनतेला वाटू लागले आहे. विरोधकांनी सत्ताधारी पक्षांना ह्या प्रकरणावरून पेचात पकडले आहे.

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *