सदावर्ते गट आणि शिंदे गट शिवसेना यांच्यात एसटी बँकेमध्ये संचालकांमध्ये तुफान हाणामारी

सविस्तर वृत : मुंबई : मुंबई सेंट्रल येथील एसटी को-ऑपरेटिव्ह बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत बुधवारी (15 ऑक्टोबर) तुफान राडा झाला. वकील गुणरत्न सदावर्ते यांचं पॅनल आणि शिवसेना नेते आनंदराव अडसूळ यांच्या पॅनलमधील संचालकांमध्ये भ्रष्टाचार आणि अश्लील वर्तनाच्या आरोपांवरून वाद उसळला. हा वाद हिंसक झाला, ज्यात बाटली फेकली गेली, मारहाण झाली आणि शिवीगाळ करण्यात आली. यात पाच ते सहा जण जखमी झाल्याची माहिती आहे. नागपाडा पोलीस ठाण्यात दोन्ही बाजूंनी तक्रारी दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
नेमकं काय घडलं? : एसटी बँकेच्या मुख्यालयात बुधवारी आयोजित बैठकीत भ्रष्टाचाराच्या मुद्द्यांवर चर्चा सुरू झाली. अडसूळ गटानं सदावर्ते गटावर भ्रष्टाचाराचे आरोप केले, तर सदावर्ते गटानं अडसूळ गटातील संचालकांवर महिला कर्मचाऱ्यांशी अश्लील वर्तनाचा आरोप करत बाटली फेकली. यानंतर दोन्ही गटांमध्ये हाणामारी, कपडे फाडणे आणि शिवीगाळ झाली. काहींनी याचं व्हिडिओ चित्रिकरण करण्याचा प्रयत्न केला असता, त्यांच्यावर बाटली फेकण्यात आली. या राड्यानंतर घटनास्थळी पोहोचलेल्या नागपाडा पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दोन्ही गटांनी परस्परविरोधी तक्रारी दाखल केल्या आहेत
आज एसटी को-ऑपरेटिव्ह बँकेच्या संचालक मंडळाची मीटिंग घेण्यात आली होती. त्यात अडसूळ गटातील संचालकांनी सदावर्ते गटातील संचालकांनी बँकेत भ्रष्टाचार केल्याचा गंभीर आरोप केला. ज्यानंतर या बैठकीत अक्षरश: फ्री स्टाइल हाणामारी पाहायला मिळाली.
ही हाणामारी अक्षरशः कपडे फाडण्यापर्यंत गेली. तर दोन्ही गटाच्या लोकांनी एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी तुडवलं. संचालकांचा हा राडा आता पोलीस स्टेशनपर्यंत गेला असून पुढील कारवाई चालू आहे
मुंबईतील एसटी को-ऑपरेटिव्ह बँकेत सदावर्ते आणि शिंदेंच्या सेनेच्या अडसूळ गटाच्या संचालकांमध्ये कर्मचाऱ्यांच्या आयोजित बैठकीत तुफान हाणामारी झाली. या घटनेमध्ये संचालकांनी एका महिलेला मारहाण, शिवीगाळ आणि जातीवाचक शिवीगाळ केल्याचा गंभीर आरोप आहे.
पीडित महिलेच्या म्हणण्यानुसार, तिच्यावर हल्ला करत कपडे फाडण्यात आले आणि मंगळसूत्र तोडण्यात आले. या प्रकरणी धीरज तिवारी, बणकर, सुनील राठोड आणि प्रवीण जाधव या चार संचालकांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पीडित महिलेने आपल्याला मारहाण झाल्याचे आणि हाताला मार लागल्याचे म्हटले आहे. हा वाद वाढण्यामागे राजकीय लागेबांधे आणि काही संचालकांनी आमिषापोटी दुसऱ्या गटात प्रवेश केल्याचे कारण असल्याचेही बोलले जात आहे. हे प्रकरण आता पोलीस ठाण्यात पोहोचले असून पुढील तपास सुरू आहे.
मुंबईतील एसटी को-ऑपरेटिव्ह बँकेत सदावर्ते आणि शिंदेंच्या सेनेच्या अडसूळ गटाच्या संचालकांमध्ये कर्मचाऱ्यांच्या आयोजित बैठकीत तुफान हाणामारी झाली. या घटनेमध्ये संचालकांनी एका महिलेला मारहाण, शिवीगाळ आणि जातीवाचक शिवीगाळ केल्याचा गंभीर आरोप आहे.
