मुंबईमध्ये भररस्त्यात पतीचा पत्नीवर धारधार शास्त्राने हल्ला …

मुंबईतील एका 32 वर्षीय व्यक्तीने सोमवारी आपल्या पत्नीवर वस्तरा ब्लेडने हल्ला केला आणि घरगुती वादातून स्वतःचे मनगटही कापले.गिरगांव परिसरातील खाडिलकर रोडवर सकाळी १० वाजताच्या सुमारास अचानक घडलेल्या या घटनेत महिला गंभीर जखमी झाली, या जोडप्याला नंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले.

सविस्तर वृत्त…  सागर बेलोसे (३२) आणि त्याची पत्नी शितल चव्हाण (३०) यांच्यात घरगुती कारणावरून वाद होत असत ह्या सततच्या वादामुळे तिने राहते घर सोडले. आणि गेल्या एक महिन्यापासून ती आपल्या आई-वडिलांकडे राहात होती, सागर ने बऱ्याच वेळा तिच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता, पण ती त्याच्याकडे दुर्लक्ष करत होती.रोज प्रमाणे सकाळी शितल आपल्या दैनंदिन कामासाठी आपल्या गिरगांव येथील कार्यालयात जात असताना सागर ह्याने शितलचा पाठलाग करून शितलला थांबवण्याचा प्रयत्न केला पण शितल काही ऐकण्याच्या व समजण्याच्या मनस्थितीत नसल्यामुळे तिने पुन्हा दुर्लक्ष केले सागरला ह्याच गोष्टीचा राग डोक्यात गेल्यामुळे सागरने आपल्यासोबत आणलेले धारधार शस्त्राने (ब्लेडने) शितलवर हल्ला केला.

शितल भरदिवसां लोकांच्या वर्दळीत रक्ताच्या थारोळ्यात रस्त्यावर पडली. आणि तिला रक्ताच्या थारोळ्यात पडलेले बघून सागरनेही आपला जीव संपवण्याच्या विचाराने स्वतःच्या मनगटावर आणि शरीरावर स्वतः वार केले आणि तो ही रक्ताच्या थारोळ्यात भर गर्दीत तिकडेच उभा राहिला.

तेथील स्थानिक नागरिकांनी हे सर्व घडत असताना प्रसंगावधान साधून सागरला पकडून ठेऊन पोलिसांशी संपर्क केला असता पोलीस आणि स्थानिक नागरिक ह्यांच्या सतर्कतेमुळे मोठा गुन्हा होण्यापासून रोखला गेला  पोलिसांनी त्वरित क्षणाचाही विलंब न करता दोघांनाही तातडीने रुग्णालयात दाखल केले असून, दोघेही मृत्यूपासून बचावले आहेत.

पोलिसांना संपर्क केला असता पुढील तपास करून ह्या घटनेच्या मुळाशी जाऊन गुन्हेगारावर योग्य ती कार्यवाही करण्यात येईल असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ह्यांनी माहिती दिली.

 

 

 

 

 

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *