एसटी महामंडळाकडून प्रवास भाड्यात वाढ

एन सनासुदी एसटी महामंडळाकडून दिवाळी आधी प्रवास भाड्यात वाढ गोरगरीब जनतेच्या खिशाला बसणार कातरी

सविस्तर वृत : सध्या सणासुदीचा काळ आहे. दिवाळी तोंडावर आली आहे. त्यामुळे मुंबई, पुणे यासारख्या मोठ्या शहरांत नोकरी, कामासाठी आलेले चाकरमानी दिवाळी साजरी करण्यासाठी आपापल्या गावी जातात. दिवाळीच्या काळात लहान मुलांच्या शाळेलाही सुट्टी असते. त्यामुळे याच काळात काही कुटुंब फिरायला जाण्याचाही प्लॅन करतात. दरम्यान, आता याच सणासुदीच्या काळात एसटी महामंडळाने मोठा निर्णय घेतला आहे. महामंडळाच्या या निर्णयामुळे आता एसटीने प्रवास करणे महागणार आहे

दिवाळीच्या काळात एसटी महामंडळाची मोठी परीक्षा असते. कारण या काळात राज्यभरातील चाकरमानी आपापल्या गावी जातात. सुट्ट्या असल्याने बसस्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी पाहायला मिळते. बसमध्ये बसण्यासाठी लोकांची अक्षरश: झुंबड उडते. या काळात लोकांनी आपापल्या इप्सित स्थळी पोहोचावे यासाठी एसटी महामंडळ पूर्ण ताकदीने काम करते. याच काळात एसटी महामंडळाच्या महसुलात मोठी वाढ होते. त्यामुळे प्रवाशांचा वाढणारा ओघ लक्षात घेता एसटी महामंडळाच्या तिजोरीत वाढ व्हावी यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे

15 ऑक्टोबर 2025 पासून ही भाडेवाढ लागू होईल आणि ती 05 नोव्हेंबर 2025 पर्यंत कायम राहील. म्हणजेच तब्बल 22 दिवस ही दरवाढ तिकीट दरांवर परिणाम करणार आहे. सर्वसामान्य साधी, जलद बससेवांसोबतच निमआराम, साधी शयनयान (स्लीपर), शिवशाही आणि जनशिवनेरी यांसारख्या लोकप्रिय सेवांवर ही दरवाढ लागू होणार आहे

15 ऑक्टोबर 2025 रोजी मध्यरात्री 00.00 वाजल्यापासून प्रवास सुरू करणाऱ्या प्रवाशांना वाढीव दर लागू होतील.

ॲडव्हान्स बुकिंग ज्या प्रवाशांनी आधीच तिकीट बुक केले आहे, त्यांना वाहकाकडे जुना आणि नवीन तिकीट दर यातील फरक जमा करावा लागेल.

पासेस आणि सवलत: विद्यार्थी पासेस आणि मासिक-त्रैमासिक पासेस वापरणाऱ्यांना ही भाडेवाढ लागू होणार नाही. मात्र, इतर सामाजिक घटकांना मिळणाऱ्या सवलतीच्या तिकीटांसाठी  देखील ही 10 टक्क्यांची दरवाढ लागू असेल

प्रवाशांना दिलासा देणारी बाब म्हणजे वातानुकूलित शिवनेरी 09 मीटर आणि 12 मीटर ई-बसेस (शिवाई) या सेवांच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. या बसच्या दरात वाढ न झाल्याने या प्रवाशांना दिलासा मिळाला आहे

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *