दशावतार सिनेमा पाहण्यासाठी प्रेक्षकांनी केली सिनेमागृहात गर्दी केली चांगली कमाई

सविस्तर वृत :दशावतार’ने पहिल्याने दिवशी आरपार कमाई केली आहे. अभिनेते दिलीप प्रभावळकर यांची प्रमुख भूमिका असलेला दशावतारा या बहुप्रतिक्षीत सिनेमानं पहिल्या दिवसी चांगली कमाई करण्यात यश मिळवलं आहे
दशावतार’ हा बहुप्रतीक्षित सिनेमा अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आला असून बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. रिलीजच्या दुसऱ्या दिवशी या चित्रपटाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळतोय. बॉक्स ऑफिसवरील भरघोस कमाई सर्वकाही सांगत आहे. दिलीप प्रभावळकर यांनी ज्याप्रकारे बाबुली मेस्त्रीची भूमिका साकारली आहे त्याला तोड नाही
रजनीकांत यांच्या नावाचा विचार झाला होता का, या प्रश्नावर सुबोध खानोलकर हसून म्हणाले, “ते रजनीकांतपेक्षा कमी आहेत का? रजनीकांत यांचा विचार वगैरे आम्ही कधीच केला नव्हता.”
सुबोध खानोलकर यांनी ‘हापूस’ आणि ‘संदूक’ नंतर ‘दशावतार’ हा कोकणातील पार्श्वभूमीवर आधारित चित्रपट लिहिला आहे. दिग्दर्शनाबद्दल बोलताना ते म्हणाले, “दिग्दर्शन करायचं असं काही ठरलं नव्हतं, पण ही कथा दुसऱ्या कोणाच्या हातात दिली असती, तर माझ्या मनात जे होतं, ते नीट पोहोचवता आलं नसतं.”
सुबोध पुढे म्हणाले, “कथा वाचल्यानंतर सगळ्यांच्याच लक्षात आलं की ‘बाबुली’ची भूमिका खूप कठीण आहे. माझ्या डोळ्यासमोर फक्त दिलीप प्रभावळकरांचंच नाव होतं. आमची ओळखही नव्हती. मी नंबर मिळवून त्यांना भेटायला येऊ का असं विचारलं.” दिलीप प्रभावळकर हे असे कलाकार आहेत की, जे संपूर्ण स्क्रिप्ट हातात असल्याशिवाय आणि त्यातले बारकावे माहीत असल्याशिवाय होकार देत नाहीत.
सॅकनिल्क’च्या माहितीनुसार, दशावतार या सिनेमानं पहिल्या दिवशी भारतात 57 लाखांची कमाई केली आहे. तर सिनेमाचं वर्ल्डवाइड कलेक्शन हे 65 लाख इतकं झाले आहे
