मुंबई बेस्ट निवडणुकीत भाजपाची मोठी खेळी आणि ठाकरे बंधून चा दारुण पराभव

सविस्तर वृत : मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे एकत्र आल्याने दी बेस्ट दी बेस्ट एम्प्लॉईज को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या निवडणूक(Best Employees Credit Society Election) प्रतिष्ठेची बनली होती. राज्याचे लक्ष लागलेल्या या निवडणुकीचा निकाल मंगळवारी रात्री उशिरा लागला असून यात ठाकरे बंधूंच्या उत्कर्ष पॅनेलचा दारुण पराभव झाला
शशांक राव यांनी या विजयानंतर पत्रकारांशी संवाद साधताना या विजयामागचे कारण सांगितले. ते म्हणाले, हा विजय आहे तो कामगारांचा आहे. मागील नऊ वर्षांपासून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची सत्ता पतपेढीवर होती. शिवसेनेची पालिकेत सत्ता होती. ‘बेस्ट’मध्ये अनेक वर्ष सत्ता होती. त्यांनी या काळात बेस्टचे खासगीकरण करून कामागारांच्या विरोधात काम केलं. त्या विरोधात कामगारांनी आपलं मत नोंदवलं
विजयानंतर शशांकराव आणि प्रसाद लाड यांना भाजपने मोठं गिफ्ट दिलं आहे. याबाबतची घोषणा मंत्री आशिष शेलार यांनी केली आहे. ते म्हणाले, या निवडणुकीमध्ये आम्ही भाजप राजकीय पक्ष म्हणून उतरलंच नव्हतो. कारण ही निवडणूक बेस्टवर प्रेम करणाऱ्या सर्व सामान्य कर्मचाऱ्यांचीआणि मराठी माणसाची होती. मात्र याच राजकारण दोनी ठाकरे बंधूने केले म्हणून त्यांना ऐक ही खात उघडता नाही आलं आणि निकाल सर्व सामान्य माणसाच्या बाजूनी लागला आहे.
