सुप्रीम कोर्टाचा आज वक्फ विधेयका बद्दल मोठा निर्णय

सुप्रीम कोर्टाकडून वक्फ कायद्याला घेऊन मोठा निर्णय देण्यात आला आहे कोर्टाकडून काही विशेष बाबींवर लक्ष केंद्रित करण्यात आले

सविस्तर वृत : सरन्यायाधीश भूषण गवई आणि न्यायमूर्ती ए जी मसीह यांच्या खंडपीठाने मालमत्ता नोंदणीशी संबंधित मुद्द्यावर कोणतीही बंदी घातलेली नाही. तसेच संपूर्ण कायद्याला स्थगिती देण्यासही न्यायालयाने नकार दिला आहे. “आम्ही म्हटले आहे की, कोणतेही गृहीतक नेहमीच कायद्याच्या घटनात्मकतेच्या बाजूने असते आणि दुर्मिळातील दुर्मिळ प्रकरणांमध्येच (पूर्ण कायदा स्थगित करण्यासारखा) हस्तक्षेप केला जाऊ शकतो”, असे खंडपीठाने आपल्या अंतरिम आदेशात स्पष्ट केले

सर्वोच्च न्यायालयाने यावर अंतरिम निर्णय दिलाय. संपूर्ण वक्फ कायदा स्थगित करण्याला काही आधार नाहीय असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे. फक्त दोन महत्वाच्या तरतुदी कोर्टाने स्थगित केल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयात आज वक्फ संशोधन अधिनियम 2025 वर सुनावणी झाली. सुप्रीम कोर्टाने वक्फ (संशोधन) अधिनियम 2025 च्या वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकांवर निकाल दिला. कायद्यातील काही तरतुदींना स्थगिती दिली. वक्फ बोर्डाच सदस्य बनण्यासाठी कमीत कमीत पाच वर्ष इस्लामचा पालन करण्याची अट ठेवली होती, त्याला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिलीय. कोर्टाने म्हटलय की, यासंबंधी उचित नियम बनेपर्यंत ही तरदूत लागू होणार नाही

सर्वोच्च न्यायालयाने यावर अंतरिम निर्णय दिलाय. संपूर्ण वक्फ कायदा स्थगित करण्याला काही आधार नाहीय असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे. फक्त दोन महत्वाच्या तरतुदी कोर्टाने स्थगित केल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयात आज वक्फ संशोधन अधिनियम 2025 वर सुनावणी झाली. सुप्रीम कोर्टाने वक्फ (संशोधन) अधिनियम 2025 च्या वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकांवर निकाल दिला. कायद्यातील काही तरतुदींना स्थगिती दिली. वक्फ बोर्डाच सदस्य बनण्यासाठी कमीत कमीत पाच वर्ष इस्लामचा पालन करण्याची अट ठेवली होती, त्याला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिलीय. कोर्टाने म्हटलय की, यासंबंधी उचित नियम बनेपर्यंत ही तरदूत लागू होणार नाहीइस्लामवर विश्वास ठेवणारी कोणतीही व्यक्ती अल्लाहच्या नावाने किंवा धर्मादाय उद्देशासाठी एखादी स्थावर किंवा जंगम मालमत्ता दान करते तिला वक्फ असे म्हणतात.

अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयाच्या याआधीच्या आकडेवारीनुसार, वक्फ बोर्डाकडे संपूर्ण भारतात सुमारे ८.७ लाख मालमत्ता आहेत, ज्या सुमारे ९.४ लाख एकर जमिनीवर आहेत. त्यांची एकूण किंमत सुमारे १.२ लाख कोटी रुपये असल्याचे सांगितले जाते. जगात सर्वाधिक वक्फ मालमत्ता भारतात आहेत. लष्कर आणि रेल्वेनंतर, वक्फ बोर्डाकडे भारतातील सर्वात जास्त जमीन आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *