मनीष सिसोदिया ह्यांना १७ महिन्यानंतर सुप्रीम कोर्टाचा दिलासा .

सविस्तर वृत्त: मनीष सिसोदिया यांना गेल्या वर्षी फेब्रुवारी मध्ये अटक करण्यात आली होती तेंव्हा पासून ते तुरुंगात आहेत. दिल्ली मद्य घोटाळ्याशी संबंधित मनीलॉंड्रीग प्रकरणात माजी उपमुख्यमंत्री यांना ह्या प्रकरणामध्ये अटक झाली होती. गेल्या वर्षी अटक झाल्यानंतर मनीष सिसोदिया ह्यांच्या वकिलांनी वारंवार जामीनासाठी सुप्रीम कोर्टात अपील केले होते. पण काही कारणास्तव त्यांची बेल होऊ शकली नाही. पण आज अपील केल्यानंतर सुप्रीम कोर्टाने मनीष सिसोदिया यांना १० लाख रुपयांचा जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला गेला आहे. दरम्यान मनीष सिसोदिया यांना सरेंडर करावा लागणार आहे. तसेच दर सोमवारी आणि गुरुवारी सकाळी १०:०० ते ११:०० ह्या सुमारास तपास अधीकार्याला अहवाल द्यावा लागेल. ते साक्षीदारांवर प्रभाव टाकण्याचा किंवा पुराव्यांना मिटवण्याचा प्रयत्न करणार नाही असे ही न्यायमूर्ती यांनी नमूद केले .

ट्रायल कोर्टात पाठवण्याची ईडी ची मागणी फेटाळून लाऊन जामीन हा नियम आहे तुरुंग हा अपवाद आहे खटला पूर्ण केल्याशिवाय तुरुंगात ठेवता येत नाही आणि शिक्षा ही देता येत नाही हे हायकोर्टाने आणि ट्रायल कोर्टाने समजून घ्यायला हवे असे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे. सिसोदिया यांना जामिनासाठी ट्रायल कोर्टात हा आमच्या न्यायाचा अपमान झाल्यासारखा होईल त्या मुळे आम्ही मनीष सिसोदिया यांना जामीन देत आहोत असे ईडी च्या वकिलांना आणि ईडीला सुप्रीम कोर्टाने सुनावून जामीन मंजूर केला. हा जामीन मिळाल्या नंतर मनीष सिसोदिया यांचा वकील ऋषिकेश कुमार यांनी माध्यमान समोर असे सांगितले कि हा एक सुप्रीम कोर्टाकडून जामीन मंजूर करून ऐतिहासिक निर्णय दिला आहे
ह्या निर्णयानंतर आम आदमी पार्टी ( आप ) च्या कार्यकत्यांमध्ये जल्लोष्याचे वातावरण निर्माण झाले आहे .
